अस्तगाव गट जनसेवाच्या विजयाचा शिल्पकार ठरणार - खा. डॉ. विखे

अस्तगाव गट जनसेवाच्या विजयाचा शिल्पकार ठरणार - खा. डॉ. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अस्तगाव गटातील मतदान हे जनसेवा मंडळाचे विजयाचे शिल्पकार ठरणार आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

गणेशचे मतदान संपल्यानंतर अस्तगाव गटातील सभासदांच्या आभार सभेत खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी अस्तगाव, पिंप्रीनिर्मळ, खडकेवाके, कोर्‍हाळे भागातील सभासद उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, आपण स्वत: उमेद्वार आहोत या भूमिकेतुन कार्यकर्त्यांनी काम केले. संघटनेतील कार्यकर्त्यांनी प्रामणिक काम केले. ही निवडणूक लादली गेली. या निवडणुकीत लागलेल्या निकालाच्या यादीत अस्तगाव गट हाच विजयाचा शिल्पकार ठरणार आहे. गणेशची निवडणूक हाती घेतल्यानंतर 2 जून पासून परिस्थिती बदलण्यात आपल्याला यश आले, असेही ते म्हणाले.

कामे करुन निवडणुकीत उत्तर देण्याची वेळ येते हे दुर्दैवी आहे. कार्यकर्त्यांनी कष्ट मेहनत घेतली व संघटितपणे सामोरे गेले असून जनसेवा मंडळाचा विजय निश्चित आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील

गणेशच्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाचा विजय निश्चित आहे. सभासद हा कारखाना परिवर्तन मंडळाच्या ताब्यात देतील. शेतकरी हिताच्या निर्णयासाठी आ. बाळासाहेब थोरात आणि आम्ही गणेशच्या निवडणुकीत एकत्र आलो असून पुढील काळात गणेशच्या सभासद, कामगार हिताचे योग्य निर्णय घेतले जातील.

स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com