गणेश विसर्जनाबाबत अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना

बेलापूरच्या प्रवरा नदी विसर्जन ठिकाणाची केली पाहणी
गणेश विसर्जनाबाबत अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिल्या सूचना

बेलापूर |वार्ताहर| Belapur

गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी बेलापूर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पाहणी करून बेलापूर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्‍यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सूचना दिल्या.

बेलापुरात एकूण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असून सर्व गणेश मंडळे गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात. तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपूर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरिता बेलापूरला येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपूरच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत माहिती दिली.

यावेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा, बॅरिकेट़्स लावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संबंधितांना दिल्या. गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणा़र्‍या तरुणांची टीमही तयार ठेवण्यात आली असून तीच मुले नदी पात्रात जाऊन गणेश विसर्जन करतात. इतरांना खोल पाण्यात जाऊ दिले जात नाही, तसेच या ठिकाणी बॅरिकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, हवालदार अतुल लोटके, हरिष पानसंबळ, पत्रकार देविदास देसाई, विशाल आंबेकर, रमेश अमोलीक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com