बाप्पांसोबत रौनकही येणार!

नगरच्या बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा
बाप्पांसोबत रौनकही येणार!

अहमदनगर | ahmednagar -

करोना संकटामुळे ( covid-19) काळवंडलेला बाजार ( nagar market) यंदा गणेशोत्सवाच्या ( Ganeshotsav) निमित्ताने सकारात्मक मानसिकतेच्या उर्जेने उजळून निघेल आणि बाप्पांच्या आगमनासोबत गेलेली रौनकही पुन्हा परतेल, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

दीड वर्षापासून करोना संकटामुळे बाजारपेठा मंदावल्या आहेत. व्यापारावर या संकटाचा तीव्र परिणाम झाला आहे. अनेक दिवस ( Lockdown ) लॉकडाऊनमुळे बाजार निस्तेज झाला. उलाढाल मंदावल्याने रोजगारासह ( employment ) उत्पन्नावरही परिमाण झाला आहे. अनेक निर्बंधांमुळे व्यापार करणे कठीण झाले होते.

नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्याने अत्यावश्यक वस्तूंशिवाय अन्य खरेदीकडे पाठ फिरवली होती. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मिठाई ( Clothing, electronics and sweets ) यासह बाजारपेठेतील अन्य दुकांनांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बैलपोळा निमित्ताने बाजारात दोन दिवसांपासून वर्दळ दिसली. त्यासोबत गणेशोत्सवासाठी दुकाने सजू लागली आहे. यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवावर करोनामुळे निर्बंध आहेत. मात्र घरगुती गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार अशी चिन्हे आहेत. संकट आणि नकारात्मकतेला बाजूला सारून विघ्नहर्ता यंदा आनंद घेवून घेईल, अशी सामान्यजनांची कामना आहे.

सजावटीचे साहित्यांने बाजारपेठ सजू लागली आहे. या गणेशोत्वासोबत सण-उत्सवाचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत गणेशोत्सवात उलाढाल किती होणार, यापेक्षा बाजारपेठेची रौनक परतणार याबाबात व्यापारीवर्ग आशावादी आहे.

दीड वर्षापासून आपण सर्व करोनाच्या भयासह जगत आहोत. याचा परिमाण गणेश उत्सवावरही झाला. उत्सवासाठी कडक निर्बंध असल्याने सामान्य स्थितीच्या तुलनेत गेल्यावर्षी सजावटीच्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात मंदावली. यंदा काही प्रमाणात आशादायी चित्र आहे. सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी अनेकांचे पाय दुकानांकडे वळत आहेत. करोना टाळण्यासाठी आम्ही विक्रेते म्हणून काळजी घेत आहोत. नागरिकांनीही नियमांचे पालन करत करोना पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.

- भूषण फिरोदिया, कापड बाजार

करोनाचे दुष्टचक्र लवकर संपुष्टात यावे. सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत. आपल्या शहरासह देशावरील संकट गणपती बाप्पांच्या आगमनासोबत समाप्त व्हावे, अशी प्रार्थना गणेशचरणी आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांसह व्यापारीही उत्सुक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विविध मिठाईसोबत मोदक निर्मितीही सुरू आहे. आम्ही तयारीत आहोत. आता गणपती बाप्पांसोबत उत्साह संचारावा, अशी अपेक्षा आहे.

- सचिन जग्गड, महेंद्र पेडावाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com