Ganesh festival : मंडळांसाठी महापालिकेची ‘एक खिडकी’
अहमदनगर महापालिका

Ganesh festival : मंडळांसाठी महापालिकेची ‘एक खिडकी’

अहमदनगर | ahmednagar -

करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मनपाने ahmednagar municipal corporation केले असून गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी विविध परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मंडळांनी मनपा व स्थानिक प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर रोहिणी शेंडगे mayor rohini shendage यांनी दिली आहे.

गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचेकडील नोंदणी प्रमाणपत्र, संबंधीत पोलिस स्टेशनचा व शहर वाहतुक नियंत्रण शाखेचा नाहरकत दाखल घेवून मनपात अर्ज दाखल करावा. तसेच मनपाच्या अग्निशमन विभाग, नगररचना विभाग व बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखले हे एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कागदपत्रांची पुर्तता करून महापालिका आयुक्त municipal commissioner यांच्या नावे अतिक्रमण निर्मूलन विभागात लेखी अर्ज परवानगीसाठी सादर करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

दरम्यान, गणेश मंडळांनी कोरोना नियमांचे पालन करून मंडपा जवळ गर्दी करू नये. तसेच मंडप परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी. नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदीबाबत गणेश मंडळांनी प्रबोधन करावे. गणेश उत्सव साजरा करताना लहान मुले व वयोवृध्द नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळा करिता 4 फुटापर्यंत व घरगुती गणपती मूर्ती 2 फुटापर्यंत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पुजन करावे. मूर्ती शाडू मातीची पर्यावरण पुरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com