गणेशोत्सवाऐवजी झाडांची रोपे व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

गणेशोत्सवाऐवजी झाडांची रोपे व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

भेंडा |वार्ताहर| Bhenda

देशावरील करोनाचे संकट लक्षात घेऊन भेंडा येथील विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानने

गणेशोत्सवाऐवजी वृक्ष रोपणासाठी झाडांची रोपे व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

भेंडा येथील विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानने यावर्षी गणपती न बसवता गणेशोत्सवासाठी होणार्‍या खर्चातून श्रीसंत नागेबाबा संस्थानचे अंकुश महाराज कादे यांचे हस्ते व डॉ. रेवणनाथ पवार, जलमित्र सुखदेव फुलारी यांचे प्रमुख उपस्थितीत साक्षी बापूसाहेब काळोखे, पुजा सतीश नजन, श्रद्धा राजेश शेळके, यश सुभाष बोरुडे, नवोदय निवड झालेला विद्यार्थी भावेश जयसिंग करपे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.उपस्थितांना झाडांची रोपे वाटण्यात आली.

जलमित्र सुखदेव फुलारी म्हणाले, झाड आणि पाऊस यांचा अतिशय घनिष्ठ संबध आहे. पावसासाठी झाडे वाढवली पाहिजे. माणसाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायूही झाडापासूनच मिळतो. एका माणसाला एका दिवसासाठी 15 किलो प्राणवायू (ऑक्सिजन) आवश्यक असतो. 15 किलो ऑक्सिजन तयार होण्यासाठी किमान सात झाडांची गरज असते.

निर्सगाने फुकट दिलेल्याची माणसाला किंमत नाही. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावून त्याचे संगोपन करा. पुढील पिढीसाठी केवळ धन कमावून न ठेवता त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व भविष्यासाठी मुबलक पाणी आणि ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

त्यासाठी आज पासूनच जल, जंगल, जमीन, जनावर व जनता या पाच गोष्टींची जपवणूक करा. झाड नुसते लावू नका तर त्याच्या वाढीसाठी सामुदायिक प्रयत्न व्हावेत असे आवाहनही श्री. फुलारी यांनी केले.

अंकुश महाराज कादे व डॉ. रेवणनाथ पवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी रामकृष्ण आठरे, सुनील दगडे, शिवाजी फुलारी, सुखदेव गव्हाणे, संदीप गव्हाणे, रामेश्वर गव्हाणे, अमोल मुनोत, रवींद्र फुलारी, साईनाथ गोंडे, पत्रकार संतोष औताडे, ऋषिकेश गव्हाणे, अमोल नवले, सौरभ गव्हाणे, योगेश दळे, कल्याण नवले, ज्ञानेश्वर नवले, प्रदीप नवले, हर्षद दगडे, प्रथमेश मुंढे, भगवान दळे, ओमकार शेटे, प्रकाश नवले, अक्षय नवले, कैलास चेडे, सुजय नवले, अक्षय जगताप, सीताराम आरगडे, नंदकिशोर गव्हाणे, राहुल भिसे आदी उपस्थित होते.

युवराज फुलारी याने प्रस्ताविकातून मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. अमोल नवथर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज गव्हाणे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com