‘गणेश’च्या निवडणुकीत तिरंगी लढत

विखे विरुद्ध थोरात- कोल्हे गटात सामना, शेतकरी संघटनेचे आठ उमेदवार रिंगणातसभासदांचा कौल
साखर कारखाना
साखर कारखाना

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा, माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळ व शेतकरी संघटना असा तिरंगी सामना गणेश निवडणुकीत रंगणार आहे.

ऐनवेळी थोरात कोल्हे गटाबरोबर शेतकरी संघटनेेची जागा वाटपाच्या घोळामुळे शेतकरी संघटनेचे 8 उमेदवारांचा पॅनल रिंगणात आहेत. तर कोल्हे गटाच्या एका उमेदवाराची वेळेत माघार न झाल्याने तो उमेदवारही अपक्ष म्हणुन रिंगणात आहे. 19 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत.

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 19 जागांसाठी 17 जून रोजी होत आहे. या निवडणुसाठी पाच गटातून 8150 सभासद मतदार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी 92 उमेदवारांपैकी 45 उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता रिंगणात 47 उमेद्वार आहेत. गणेशच्या या निवडणुकीत जोरदार लढत होण्याचे संकेत आहेत. विद्यमान महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसुलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात या आजी माजी मंत्र्यांच्या सहभागामुळे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीतील उमेदवार गटनिहाय असे- शिर्डी गट- बाबासाहेब रामभाऊ डांगे, बाबासाहेब परशराम मते (दोघे विखे गट), बाबासाहेब दादा डांगे, विजय भानुदास दंडवते (दोघे थोरात कोल्हे गट), भाऊसाहेब पंढरीनाथ शिंदे (शेतकरी संघटना).

राहाता गट- उत्तम बळवंत डांगे, अनिल सोपान सदाफळ, पुंजाजी दगडू गमे (तिघे विखे गट), गंगाधर पांडूरंग डांगे, नारायणराव ज्ञानेश्वर कार्ले, संपत कचरु हिंगे (तिघे थोरात कोल्हे गट).

अस्तगाव गट - शिवनाथ नेवजी घोरपडे, संजय कारभारी नळे, जालिंदर गंगाधर मुरादे (तिघे विखे गट), महेंद्र चांगदेव गोर्डे, नानासाहेब काशिनाथ नळे, बाळासाहेब कुंडलिक चोळके (थोरात कोल्हे गट), सतीश पंढरीनाथ मोरे (शेतकरी संघटना).

वाकडी गट- विशाल पुरुषोत्तम गोरे, राजेंद्र विठ्ठल लहारे, संपत काशिनाथ शेळके (तिघे विखे गट), अरुंधती अरविंद फोपसे, सुधीर वसंतराव लहारे, विष्णुपंत शंकर शेळके (थोरात कोल्हे गट).

पुणतांबा गट- दत्तात्रय सदाशिव धनवटे, बाळासाहेब दत्तात्रय गाढवे (दोघे विखे गट). संपत नाथाजी चौधरी, अनिल सोपान गाढवे (दोघे थोरात कोल्हे गट). बापु पंढरीनाथ धनवटे, नानासाहेब खुशाल गाढवे (दोघे शेतकरी संघटना).

महिला मतदार संघ- अनिता विलास कोते, गयाबाई ओंकार भवर (दोघी विखे गट), कमलाबाई पुंडलिक धनवटे, शोभाताई एकनाथ गोंदकर (थोरात कोल्हे गट). लक्ष्मीबाई नानासाहेब गाढवे (शेतकरी संघटना). वैशाली दिलीप क्षिरसागर (अपक्ष).

इतर मागास प्रवर्ग- प्रकाश रामदास पुंड (विखे गट), अनिल राजाराम टिळेकर (थोरात कोल्हे गट), नारायण गोविंद भुजबळ (शेतकरी संघटना).

अनु. जाती जमाती मतदार संघ- प्रदिप पोपटराव बनसोडे (विखे गट), अल्पेश शांतवन कापसे (थोरात कोल्हे गट). भटक्या जाती विमुक्त जमती मतदार संघ- संजय आबाजी भाकरे (विखे गट), मधुकर यशवंत सातव (थोरात कोल्हे गट). भगवंता मायजी मासाळ (शेतकरी संघटना). ब वर्ग मतदार संघ- ज्ञानदेव बाजीराव चोळके (विखे गट), सुधाकर नारायण जाधव (थोरात कोल्हे गट). असे एकूण 47 उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत. आज पासुनच प्रचार सुरु होणार असल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.

या निवडणुकीत विखे आणि कोल्हे गटाचे युती होण्याचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे विखे गटाने स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. कोल्हे गटाने थोरात गटाबरोबर युति केली. तर थोरात कोल्हे गटाबरोबर पहिल्या टप्प्यात शेतकरी संघटनाही होती. परंतु जागा वाटपात शेतकरी संघटनेला 6 जागा हव्या होत्या. त्यांना 2 जागांचा प्रस्ताव आल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल केला, 19 जागांपैकी केवळ त्यांच्या पॅनलमध्ये 8 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. गणेशची ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. सर्वच गटांनी सभासदांचे मेळावे घेतले आहेत. सत्ताधारी विखे गटावर विरोधी गटाने आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आता विखे पाटील निवडणूक मैदानात विरोधकांच्या टिकेला कसे उत्तर देतात याबद्दल उत्सुकता आहे.

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी विविध ठिकाणी बैठका घेत निवडणूक पुर्व ग्राउंड तयार केले होते. मात्र त्यांची युती होऊ शकली नाही. आमदार थोरात, कोपरगावचे विवेक कोल्हे यांनी मेळावे घेतले. विखे पाटील यांनीही राहाता येथे बैठका घेतल्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com