Ganesh Chaturthi 2021 : उत्साहाला अटी-शर्थीचा लगाम

गणेश मंडळाचे कार्यकर्ते नाराज | भक्तच नसतील तर मंडप का हवे ?
Ganesh Chaturthi 2021 : उत्साहाला अटी-शर्थीचा लगाम

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोना संकटामुळे (Corona Crisis) गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याऐवजी दर्शन केवळ ऑनलाईन (Ganpati Online Darshan) अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे, असा नियम शासनाने केला आहे. यासह अन्य अटी शर्थीमुळे यंदाही उत्सवाच्या (Ganesh Utsav)आनंदाला सरकारने लगाम लावल्याची भावना गणेश मंडळाच्या (Ganesh Mandal) सदस्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता टेबलावर बसून घातले जाणारे निर्बंध अनावश्यक असल्याचा सूर उमटला आहे. (Ganesh Utsav In Ahmednagar)

सध्या करोना संकट (Covid pandemic) कायम आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी सरकार (Govt) प्रयत्नशील आहे. याची जाणीव गणेश मंडळांना आहे. मात्र काही नियम घालून भक्तांना गणेश मंडपात दर्शनासाठी परवानगी देता आली असती, असा सूर उमटला आहे. राजकीय कार्यक्रमांना कोणतीही आडकाठी नसते. पक्षांचे दौरे, सभा, बैठकांना गर्दी चालते. मात्र सामान्य जनतेला नियमांत बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही मंडळ सदस्यांनी म्हटले आहे. आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यावर बंदी आहे. मात्र यावर नियंत्रण कसे राखले जाईल, हे स्पष्ट नसल्याचे एका मंडळ सदस्याने सांगीतले. (Ganesh Chaturthi 2021)

सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार (Guidelines for Ganesh Utsav), सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट आणि घरगुती उत्सवासाठी २ फुटांच्या मर्यादेत असावी. शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम व जनजागृती करावी. लागू करण्यात आलेले निर्बंध वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कुठलीही शिथिलता देता येणार नाही. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाचा मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकानी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे सरकारच्या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

आरतीलाही गर्दी नको

आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. भक्तांविना आरती किंवा किर्तन कसे करावे, असा प्रश्न अनेक गणेशभक्तांसमोर (Ganesha devotees) उपस्थित झाला आहे.

सरकारकडून जारी केलेल्या नियमावलीत करोनाचे कारण पुढे करत सामान्य जनतेच्या भावनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही नियमावलीच चुकीची आहे. प्रशासकीय अधिकारी जनतेपर्यंत न पोहचताच टेबलवर बसून नियम करत आहेत. उत्सव साजरा करा पण मंडपात गर्दी नको, आरास करा पण भक्तांना प्रत्यक्ष दाखवू नका, असे नियम तयार करून सरकारच गोंधळल्यासारखे करत आहे. करोना नियमाचे पालन करण्यास गणेश मंडळांनी नकार दिलेला नाही. पण आपण नियम काय लागू करत आहोत, याचा सरकारने स्वतः अभ्यास करावा.

- संजय नवसुपे, शंभूराजे मित्र मंडळ, मार्केटयार्ड नगर

राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी केली तर चालते. त्यांना कोणतेही नियम लागू पडत नाही. मात्र गणेश उत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध लादले जातात, हे चुकीचे आहेत. हिंदू बांधवांनी सण साजरेच करू नये, असे शासनाचे धोरण आहे का? नारायण राणे रॅली काढतात, काँग्रेस-राष्ट्रवादीची शिबिरे होतात. तेथे सरकार काय कारवाई करते ? सामान्य जनतेलाच करोनाच्या नावाने वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. करोना नियंत्रणात यावा यासाठी नागरिक आपल्या परिने काळजी घेतच आहेत. गणेश मंडळांनाही याची जाणीव आहे. सरकारने मात्र जनतेच्या आनंदाच्या हक्कावरही गदा आणण्याचे ठरविलेले दिसते.

- किशोर डागवाले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com