कर्जत |तालुका प्रतिनिधी|Karjat

कर्जत शहरातील शारदानगरी परिसरामध्ये युवराज पठाडे यांच्या शेतात तिरट नावाचा जुगार हार जीतच्या पैशावर खेळला जातो,

अशी गोपनीय माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अधिकार्यांना सूचना देऊन छापा घातला.

युवराज भगवान पठाडे (रा. भापकरमळा), बाळासाहेब नामदेव थोरात (वय 62 वर्षे, रा. बहिरोबावाडी), नवनाथ धोंडीबा लष्कर (वय 48, रा. बहिरोबावाडी), अनिल रघुनाथ जाधव (वय 42 वर्ष, रा. बहिरोबावाडी), भागवत भीमराव महारनवर (वय 40 वर्ष, रा. माहीजळगाव), अण्णा दशरथ यादव (वय 48 वर्षे, रा. बहिरोबावाडी), कांतिलाल सिताराम तांदळे (वय 47 वर्ष, रा. बहिरोबावाडी), लक्ष्मण हनुमंत जाधव (वय 59 वर्षे, रा. बहिरोबावाडी), सचिन जाधव (रा. बहिरोबावाडी), शशिकांत अडसूळ (रा. कोरेगाव) असे एकूण 8 जणांना खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर दोन जण फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातील 7 हजार 200 रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, भगवान शिरसाट, संभाजी वाबळे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, मच्छिंद्र जाधव यांनी केली आहे.