घरात सुरू असलेल्या तिरट जुगारावर छापा

कोतवाली पोलिसांची कारवाई; आठजण पकडले
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरात सुरू असलेल्या तिरट जुगारावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करून आठ जणांना पकडले. घराचा मालक पसार झाला आहे. मंगळवारी दुपारी बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉनसमोर, समर्थनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 हजार 800 रुपयांची रोख रक्कम, 45 हजार 500 रुपयांचे सात मोबाईल व कागदी पत्ते असा 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अप्पाजी किसन दळवी (वय 43 रा. भूषननगर, केडगाव), मच्छिंद्रनाथ नागनाथ खंडेराव (वय 35 रा. रेल्वे स्टेशन), ऋषिकेश बाळासाहेब आहेर (वय 30 रा. बुरूडगाव रोड), अमोल गोरख चव्हाण (वय 29), भूषण बाळासाहेब बोरूडे (वय 27, दोघे रा. बोरूडे मळा), जालिंदर रखमा केदार (वय 40 रा. भूषणनगर, केडगाव), प्रमोद प्रभाकर सत्रे (वय 36 रा. बुरूडगाव रोड), भाऊसाहेब रामभाऊ भोसले (वय 54 रा. बुरूडगाव रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

समर्थनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ लंकेश हरबा याच्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, योगेश भिंगारदिवे, इनामदार, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, संदीप थोरात, गाडे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी मंगळवारी दुपारी हरबा याच्या घरी छापा मारला असता आठ जण तिरट जुगार खेळताना मिळून आले. हरबा पसार झाला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com