घरात सुरू होता जुगाराचा डाव; पोलिसांनी मारला छापा

11 जुगारी पकडले || घरमालक पसार
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगावातील शिवाजीनगर परिसरात घरात सुरू असलेल्या जुगारावर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या पथकाने छापा टाकून 11 जुगारी पकडले. या प्रकरणी 12 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संदीप थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

File Photo
मांडओहोळ गोळीबारातील 'त्या' जखमी अभियंत्याचा अखेर मृत्यू

रोख रक्कम, मोबाईल, वाहने असा तीन लाख 19 हजार 480 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश शंकर आहेर (वय 29 रा. केडगाव), काळु मारूती शिंदे (वय 43 रा. वैदुवाडी, सावेडी), मारूती बळवंत नरसाळे (वय 51 रा. गोरेगाव ता. पारनेर), निलेश आदीनाथ कोतकर (वय 27 रा. केडगाव), दत्ता खुशालचंद गिरमे (वय 37 रा. लोंढे मळा, केडगाव), संजय मारूती नरवडे (वय 50 रा. दुधसागर, केडगाव), सतिष परसराम जेजुरकर (वय 34 रा. लोंढे मळा, केडगाव), दीपक पंढरीनाथ कोतकर (वय 34 रा. एकनाथनगर, केडगाव), इम्तीयाज बहादुर शहा (वय 30 रा. नागापुर), इमाम इब्राहीम पठाण (वय 62 रा. केडगाव), विजय रावसाहेब सुंबे (वय 34 रा. केडगाव) व पसार झालेला विनोद तुकाराम मगर (रा. शिवाजीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

File Photo
बिबट्याचा कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर हल्ला

विनोद मगर याच्या शिवाजीनगर येथील घरात जुगार सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक कातकाडे यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी कोतवाली पोलिसांच्या मदतीने मगर याच्या घरी गुरूवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी 11 जुगारी पकडले असून विनोद मगर हा पसार झाला आहे. पकडलेल्या जुगार्‍यांकडून दोन लाख पाच हजाराचे सात वाहने, 70 हजार 480 रूपयांची रोकड, 44 हजार रूपये किंमतीचे मोबाईल, जुगाराचे साहित्य असा तीन लाख 19 हजार 480 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

File Photo
मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले हे अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com