आडोशाला जुगार खेळणारे पकडले

कोतवाली पोलिसांची कारवाई
आडोशाला जुगार खेळणारे पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सार्वजनिक ठिकाणी तिरट जुगार खेळणार्‍या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सहा हजार रुपये रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाच्या आडोशाला काही जण जुगार खेळत आहेत. त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजता याठिकाणी छापा टाकला. त्यावेळेस पाच जण याठिकाणी गोल रिंगण करून पत्त्यांवर जुगार खेळताना त्यांना आढळून आले.

पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक बाळू वाघमारे (रा. रामवाडी, सर्जेपुरा), शेखर सतीश भिंगारदिवे (रा. माळीवाडा), धनेज दिलीप चव्हाण ( रा. आदर्शनगर, कायनेटिक चौक), चंद्रशेखर सूर्यकांत खुडे (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड), विजय अशोक कांबळे (रा. मल्हार चौक, स्टेशन रस्ता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर शहर पोलिसांनी ठिकठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com