
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चापडगाव (ता. शेवगाव) येथील दोन जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत 15 जणांना तिरट जुगार खेळताना पकडले. त्यांच्याकडील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व नऊ दुचाकी असा एकूण तीन लाख 97 हजार 30 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय श्रीधर पातकळ (वय 45 रा. चापडगाव), भगवान अण्णासाहेब वरकटे (वय 47 रा. चांगदपुरी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), लियाकत रज्जाक शेख (वय 34 रा. बोधेगाव ता. शेवगाव), पांडुरंग भीमराव पातकळ (वय 53 रा. चापडगाव), अण्णासाहेब उत्तम केदार (वय 23 रा. मंगरूळ, ता. शेवगाव), नवाब कदीर शेख (वय 42 रा. चापडगाव), शहादेव लक्ष्मण मातंग (वय 59 रा. हातगाव ता. शेवगाव), लक्ष्मण रावसाहेब नेवल (वय 47 रा. गदेवाडी ता. शेवगाव), एजाज दगडु सय्यद (वय 24 रा. बोधेगाव), विनोद दत्तात्रय नेमाणे (वय 30 रा. चापडगाव), बाळासाहेब बाबुराव फुंदे (वय 27, रा. प्रभुवाडगाव ता. शेवगाव), पांडुरंग गणपत बटुळे (वय 46 रा. प्रभुवाडगाव), दीपक राजू पातकळ (वय 23, रा. चापडगाव), रमेश नागू धनवडे (वय 58, रा. गदेवाडी), आसाराम देवराम बटुळे (वय 57, रा. प्रभुवाडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मच्छिंद्र एकनाथ धनवडे (रा. गदेवाडी) हा पसार झाला असून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चापडगाव शिवारात चापडगाव ते गदेवाडी रोडच्याकडेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी अजय पातकळ व मच्छिंद्र धनवडे हे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसमांना घेऊन तिरट नावाचा हारजीतीचा जुगार पैसे लावून खेळत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार संदीप पवार, सुरेश माळी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, भीमराज खर्से, विनोद मासाळकर, सागर ससाणे, रोहित येमुल, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने बातमीतील नमूद दोन्ही ठिकाणी कारवाई करून 15 जुगारी पकडले.