सावेडीतील तिरट जुगार अड्ड्यावर छापा

पाच जण ताब्यात; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. सावेडी उपनगरातील सिव्हिल हाडको परिसरात गणेश चौकात रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख 26 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार चेतन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण प्रभाकर कदम (वय 35 रा. बिशप कॉलनी), पांडुरंग मारूती दळवी (वय 35), सागर प्रकाश काळे (वय 33), सागर बाळासाहेब गायकवाड (वय 26) व रमाकांत राजाराम बरकसे (वय 58, सर्व रा. गणेश चौक, सिव्हिल हाडको, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिव्हिल हाडको परिसरातील गणेश चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, संदीप धामणे, सतिष त्रिभुवन यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने रविवारी मध्यरात्री नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. तेथे तिरट जुगार खेळणार्‍या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com