मध्यरात्री सहा जुगारी पकडले

एलसीबीची कायनेटीक चौकात कारवाई
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अरणगाव रोडवरील कायनेटीक चौकात एका हॉटेलच्या पाठीमागे तिरट जुगार खेळणार्‍या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. पकडलेल्या जुगार्‍यांकडून 13 हजार 140 रुपयांची रोख रक्कम, जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद हरिनारायण मुंदडा (वय 36 रा. नाथगल्ली, पैठण, जि. औरंगाबाद), आशुतोष अरुण वाघमारे (वय 19), सागर गोपिनाथ हरबा (वय 35, दोघे रा. पिरशहाखुंट), महेश बाबासाहेब चिंतामणी (वय 23 रा. गोंधळेगल्ली, माळीवाडा), अजित अशोक हजारे (वय 28 रा. बुरूडगाव रोड, चंदन इस्टेट), अजय दत्तात्रय बहीरवडे (वय 33 रा. शिवम प्लाझा चौक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्ता हिंगडे, सचिन आडबल, विनोद मासाळकर, सागर ससाणे यांचे पथक नगर शहरात फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना उपनिरीक्षक गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कायनेटीक चौकात काही लोक जुगार खेळत आहे. यानंतर उपनिरीक्षक गोरे यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापेमारी करत सहा जुगार्‍यांना पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com