
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत जंगुभाई तालमीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. जुगार खेळताना पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व दुचाकी असा 42 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार योगेश सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.
अनिल भाऊसाहेब खैरे (वय 29 रा. पंचवटी, पाईपलाइन रोड, सावेडी), अंबादास दत्तात्रय येंगुल (वय 52 रा. शमी गणपती मागे, नालेगाव), सतिष सुनील ससाणे (वय 33 रा. सर्जेपुरा), प्रशांत वसंत देठे (वय 37 रा. सुर्यानगर, पाईपलाइन रोड, सावेडी), निलेश वसंत येंगुल (वय 26 रा. दातरंगे मळा, नालेगाव) अशी पकडलेल्या जुगार्यांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप घोडके, संदीप पवार, मेघराज कोल्हे, सातपुते यांचे पथक तोफखाना हद्दीत अवैध धंद्यावर कारवाईकामी गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार पवार यांना माहिती मिळाली की, जंगुभाई तालमीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू आहे. अंमलदार पवार यांनी निरीक्षक कटके यांच्या परवानगीने रविवारी दुपारी नमूद ठिकाणी छापा मारून पाच जुगार्यांना पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्ञानेश्वर मोरे यांनी कारवाईदरम्यान सहाय्य केले.
तोफखाना पोलिसांची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने जुगारी पकडताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे.सी. मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार डी.बी. जपे, प्रदीप बडे, दीपक जाधव, वसीम पठाण, सचिन जगताप यांच्या पथकाने तपोवन रोडवरील छत्रपती संभाजी महाराज कमानीजवळ छापा टाकला. तेथे पत्र्याच्या टपरीमध्ये कल्याण जुगार खेळवित असलेल्या दिनेश तुकाराम कर्डीले (वय 42 रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) याला पकडले. अंमलदार जगताप यांच्या फिर्यादीवरून दिनेश कर्डिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.