तिरट जुगार खेळणार्‍या पाच जणांना पकडले

बागडपट्टीत कारवाई; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बागडपट्टी येथे तिरट जुगार खेळणार्‍या पाच जणांना तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी असा पाच लाख 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सचिन बाचकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रिंटू कुमार नंदलाल कुमार महातूर (वय 42), अमितकुमार अनिलसिंग कुमार (वय 31), पवन मदन राऊत (वय 49), अरविंद लखन राऊत (वय 43), राहुलसिंग गौरीशंकर सिंग (वय 26, सर्व मूळ रा. बिहार, हल्ली रा. बागडपट्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बागडपट्टी परिसरात एका बंद घराच्या आडोशाला तिरट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक समाधान सोळुंके, उपनिरीक्षक प्रियंका आठरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिरसाठ, दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, भिमा कांबळे, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, बाचकर यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने बुधवारी दुपारी पंचासमक्ष बागडपट्टी परिसरातील नमूद ठिकाणी छापा टाकला असता पाच जण तिरट जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडे रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, एक चारचाकी, एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी पाच लाख 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com