
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
झेंडीगेट येथे जुगार खेळणार्या पाच जणांना कोतवाली पोलिसांनी छापा टाकून पकडले. शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ठाणे अंमलदार सुजय विल्यम हिवाळे यांनी फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना झेंडीगेट येथे एका किराणा दुकानाच्या मागे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यांच्या आदेशानुसार सपोनि विवेक पवार, संतोष भांड, अमोल गाढे, संदीप थोरात, फुंदे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांनी तत्काळ छापा टाकला. यावेळी पाच जण जुगार खेळताना आढळून आले. मोहसीन शेख नालमोहम्मद (रा. झेंडीगेट), वाजीद दगडु शेख (रा. गोविंदपुरा), प्रकाश नारायण ठोंबे (रा. झेंडीगेट), कुदुसमणी बागवान (रा. पारशाखुंट), शेख जियाउद्दीन अजीज उद्दीन, (रा. मुकुंदनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख 4 हजार 340 रुपये जप्त करण्यात आले.