गळनिंब वाळू लिलावास अटी, शर्ती लावून ठराव मंजूर

वाळू लिलाव होणेकामी विशेष ग्रामसभा
गळनिंब वाळू लिलावास अटी, शर्ती लावून ठराव मंजूर

गळनिंब |वार्ताहर| Galnimb

श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील होणार्‍या प्रवरा नदी पात्रातील वाळू लिलावास अटी शर्ती लावून होकार दर्शविण्याचा ठराव संमत करण्यात आला.

गळनिंब परिसरातील प्रवरा नदीपात्रातील शासनाच्या धोरणानुसार वाळू लिलाव होणेकामी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेलापूरचे मंडलाधिकारी बी. सी. बोरूडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सरपंच शिवाजी चिंधे, ग्रामसेवक राजू ओहोळ, साहेबराव भोसले, संदिप शेरमाळे, आण्णासाहेब मारकड, गोपीनाथ जाटे, गणेश देठे, अर्जून बाचकर, हरीभाऊ जाटे, यांच्या उपस्थीतीत झालेल्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीत संदिप शेरमाळे यांनी मांडलेल्या सुचनेत 1992 सालापासून गळनिंब ग्रामपंचायतीस अद्यापपर्यंत गौणखनिज निधी प्राप्त झाला नसून तो त्वरीत वर्ग करण्यात यावा. सदर वाळू लिलाव हा गट नंबर 16 ची हद्द सोडून करण्यात यावा. नदी पात्रातील वसंत बंधार्‍यांच्या दोन्ही बाजूस पाचशे मिटरपर्यंत वाळूलिलाव करू नये. लिलाव बोलीवेळी शासनाने ठरविल्याप्रमाणे निधी हा आगाऊ अदा करावा व लिलाव सुरू झाल्यानंतर गावालगत पाचशे मिटरपर्यंत वाहतुकीस बंदी करण्यात येईल, अशा सुचना शेरमाळे यांनी मांडल्यानंतर साहेबराव भोसले यांनी त्यास अनुमोदन दिले.

यावेळी बाबासाहेब मारकड, सुरेश भोसले, देवचंद काळे, बाळकृष्ण तरटे, नाना वाघ, बाळासाहेब भोसले, राहूल चिंधे, शहाजी कुदनर, नितीन कोर्हाळे, आदी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.