कोपरगाव (प्रतिनिधी) -

धावपळीच्या युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे काहीं प्रमाणात मैदानावरची गर्दी कमी झाली असतानाच

काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच गोष्टी थांबल्या होत्या व मैदानावर खेळण्यावर सुद्धा परवानगी नव्हती त्यामुळे मैदानावर नियमित खेळणार्या खेळाडूंचा सराव थांबला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने अनलॉक सुरू केल्यामुळे मैदाने खुली करण्यात आल्यामुळे खेळाडूंचा सांघिक स्पर्धेत सहभाग वाढला असून या वाढलेल्या सहभागातून भविष्यातील प्रतिभावंत खेळाडू घडतील, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

साईसिटी कोपरगाव येथे आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्याहस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाची गरज आहे. सांघिक खेळातून शारिरीक क्षमतेबरोबरच व्यक्तितील इतर सुप्त गुण सुध्दा विकसित होत असतात. त्यामुळे मैदानी खेळ हे उत्तम आरोग्यासाठी वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. हार-जीत खेळाचा अविभाज्य भाग असून खेळातील जय पराजय खिलाडूवृत्तीने स्विकारा. करोना संकट अजून संपलेले नाही त्यासाठी सर्वांनी शासनाने दिलेले नियम पाळून स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व खेळाडूंनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करून खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, कृष्णा आढाव, दिनकर खरे, फकीरमामु कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, प्रकाश दुशिंग, नारायण लांडगे, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, प्रशांत वाबळे, दिनेश पवार, सोमेश आढाव, संदीप सावतडकर, हिरेन पापडेजा, संदीप देवळालीकर, धनंजय कहार, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, एकनाथ गंगुले, योगेश नरोडे, विकास बेंद्रे, गणेश लकारे, समीर वर्पे, विकी जोशी, प्रसाद रुईकर, सतीश भुजबळ, राजेंद्र भुजबळ, सागर जाधव, राहुल चवंडके, योगेश वाणी, प्रताप गोसावी, भोलू शेख, संकेत पारखे, मिलिंद सरोवर, गणेश काकड, छोटू बैरागी, नितीन शेलार, गोविंद वाकचौरे, सहभागी संघ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.