भावी डॉक्टरची रेल्वेखाली आत्महत्या

श्रीरामपूर येथील धक्कादायक घटना
भावी डॉक्टरची रेल्वेखाली आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील मूळ उक्कलगाव (Ukkalgav) येथील व सध्या शहरातील कांदा मार्केट (Onion Market) परिसरात राहणार्‍या अक्षय अनिल पावसे या 25 वर्षीय भावी डॉक्टरने (Doctor) अशोकनगर (Ashoknagar) परिसरात रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केली. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.

काल सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अशोकनगर (Ashoknagar) परिसरात एका एक्सपे्रस रेल्वे खाली तरुणाने आत्महत्या (Youth Suicide) केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर (Shrirampur) येथे आणला असता त्यावेळी या मृतदेहाची ओळख पटली. अक्षय तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून सध्या तो कांदा मार्केट (Onion Market) परिसरात राहत होता. हा तरुण मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अक्षयच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com