फर्निश प्लाझा फर्निचर दालनातून चोरी

फर्निश प्लाझा फर्निचर दालनातून चोरी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत असणारे फर्निश प्लाझा य लकीचे भोकर परिसरात फर्निश प्लाझा हे फर्निचर व गृहउपयोगी वस्तूचे प्रशस्त दालन आहे. गुरूवारी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दालनाचे मागील बाजूचे पत्र्याचे स्र्कू खोलून पत्रा वाकवून आतमध्ये प्रवेश केला.

यावेळी पत्रकार लांडगे आत झोपले होते. मात्र कुठलाही आवाज न करता चोरट्यांनी आत प्रवेश करून दोन एलइडी संच व दोन होम थियटर संच असा एकूण 42,400 रुपयांचा माल चोरून नेला. पहाटे 5 वाजेच्या दरम्यान लांडगे उठून पाठीमागील बाजूस चक्कर मारण्यास गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

याबाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशनला आज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो. नि. मधूकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. उपनिरीक्षक शरद गायमुखे करीत आहे. यापुर्वीही टाकळीभानसह परिसरात अनेक ठिकाणी चोर्‍या झाल्या असून अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.

श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादींना तीन तीन तास तिष्ठत ठेवले जाते. पोलिस निरीक्षकांनी आदेश देवूनही ठाणे अंमलदार वरिष्ठांच्या आदेशाची दखल न घेता फिर्यादींना ताटकळत ठेवतात, असा अनुभव अनेकांनी ऐकविला आहे. ठाणे अंमलदाराकडून काम चालू आहे, बाहेर बसा, संगणक चालत नाही, अगोदरच्या फिर्यादी नोंदवण्याचे काम चालू आहे असे सांगून वरिष्ठांचा आदेश झुगारत असल्याने फिर्यादींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com