साकुरीत सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा
सार्वमत

साकुरीत सोशल डिस्टसिंगचा उडाला फज्जा

शेतकऱ्यांची कृषीसेवा केंद्रा समोर मोठ्या प्रमाणात गर्दी

Nilesh Jadhav

साकुरी | Sakuri

राहाता तालुक्यातील साकुरी येथे युरीया खतासाठी शेतकऱ्यांची कृषीसेवा केंद्रा समोर आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सोशल डिस्टंसींगचे तिन तेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळाले. सकाळी सात वाजल्यापासून शेकडो शेतकरी दुकानासमोर बसलेले असल्याचे पहावयास मिळाले. दुकान चालकांच्या मनमाणी मुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.

साकुरीचे सरपंच राजेंद्र दंडवते व पोलीसांनी हस्तक्षेत करत वितरण सुरू केले एका गोणी युरीयासाठी पाच ते सहा तास थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांमधे संतापाची लाट पसरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com