नगर शहरात आता तीन अमरधाममध्ये अत्यंसंस्कार

नालेगाव अमरधामची पाहणी
नगर शहरात आता तीन अमरधाममध्ये अत्यंसंस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) -

शहर हे मुख्यालयाचे ठिकाण असल्यामुळे अतिसंवेदनशिल करोना रूग्ण उपचार घेण्यासाठी शहरामध्ये येतात. यात दुदैवाने काहींचा मृत्यू होत आहे. त्यामुळे करोना रूग्णावर शहरामध्ये अंत्यविधी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

शहरातील नागरिकांनी घाबरून जावू नये. मानवी भावनेतून केडगाव, रेल्वे स्टेशन, नागापूर या तीनही अमरधाम मध्ये करोना मृतांवर अत्यंसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नालेगाव येथील अमरधामची पाहणी महापौर वाकळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, अजय चितळे, बाळासाहेब जगताप, ऋगवेद गंधे यांनी केली.

यावेळी वाकळे म्हणाले, शहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात करोना बाधीत रूग्णांचे अंत्यविधी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. करोना मृत्यू झालेल्या नागरिकांच्या अंत्यविधीसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. रूग्णवाहिकांच्या लागलेल्या रांगाचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शहरामध्ये करोनामुळे होणार्‍या मृत्यूचे तांडव नागरिकांमध्ये जावून नागरिक भयभित होत आहेत. करोना काळात प्रत्येक नागरिकांनी आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून करोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com