देठे कुटुंबीयांकडे मदतनिधी सुपूर्द

धडाडीचा पत्रकार गमावला : अनेकांच्या भावना
देठे कुटुंबीयांकडे मदतनिधी सुपूर्द

आरडगाव | वार्ताहर

ग्रामीण भागात प्रामाणिक पत्रकारिता आणि समाजसेवा करणारे 'सार्वमत'चे धडाडीचे पत्रकार कैलास देठे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मदतनिधी उभा केला. सोमवारी हा निधी देठे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी कैलास देठे यांच्या आठवणीचे स्मरण अनेकांनी केले. पत्रकार सुनील भुजाडी म्हणाले, देठे यांच्या अकाली जाण्याने पत्रकारितेसोबत सार्वमत परिवाराची देखील मोठी हानी झाली आहे. कैलास यांनी जिवाभावाचे मित्र कमावले होते. आम्ही पत्रकार मित्र कायम त्यांच्या कुटूंबियांच्या पाठीशी उभे राहणार आहोत.

राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील पत्रकार कैलास देठे यांचे करोना संक्रमणाने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी राहुरी तालुक्यातील पत्रकार मित्रांच्यावतीने मदतनिधी जमा करण्यात आला. त्यांच्या कुटूंबियांला उभारी देण्यासाठी पत्रकार बांधवांनी स्वयंस्फुर्तीने हा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी देठे यांच्या निवासस्थानी कैलास देठे यांच्या पत्नी सविता देठे, भाऊ सुभाष देठे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला.

याप्रसंगी म्हाडा नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले, कैलास आमचा सच्चा मित्र होता. राजेंद्र वाडेकर म्हणाले, संवेदनशील पञकार मित्र कोरोनाने हिरावून घेतला. बाळासाहेब नवगिरे म्हणाले,कैलास देठे यांच्यात उत्तम संघटन कौशल्य होते. ग्रामीण पञकार संघटनेत देखील पोकळी निर्माण झाली आहे.

यावेळी ना.शिवाजी ढवळे, सुनिल भुजाडी, राजेंद्र वाडेकर, अशोक काळे, बाळासाहेब नवगिरे, वेनुनाथ शिंदे, प्रभाकर मकासरे, रमेश बोरूडे, गणेश विघे, सुनिल करपे, गोविंद फुणगे, राजेंद्र आढाव, बाळकृष्ण वाघ, गोरक्षनाथ शेजुळ, अनिल कोळसे, वसंत आढाव, रफिक शेख, रियाजभाई देशमुख, निसारभाई सय्यद, विलास कुलकर्णी, बंडु म्हसे, हरीभाऊ दिघे, विजय डौले, प्रसाद मैड, श्रीकांत जाधव, सचिन ठुबे, समिर शेख, दिपक दातीर, राजु म्हसे, विनीत धसाळ, अनिल देशपांडे, बाळासाहेब कांबळे, रहेमान शेख, बाळासाहेब रासने, दत्ताञय तरवडे, गणेश अंबिलवादे, शरद पाचरने, संतोष जाधव, आप्पासाहेब घोलप आदिंसह मानोरी येथील उपसरपंच शिवाजी थोरात, सुनिल भुजाडी, नंदकुमार दिघे, बाळासाहेब पाचरने, अमोल पाटील, विशाल तागड, दत्ताञय साळवे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com