खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तीन वर्षांनंतर अटकेत

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तीन वर्षांनंतर अटकेत

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

गेल्या तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला पाथर्डी पोलिसांनी मोठ्या शीताफीने पकडून त्याला बेड्या ठोकल्या.

पाथर्डी तालुक्यातील रांजणी गावात 2019 रोजी संशयित आरोपी बुट्या उर्फ शिवराम साहेबराव पवार (रा. रांजणी ता. पाथर्डी) याने गावातच बांधकामावर मजूर काम करणार्‍या साहिल ऊर्फ सोन्या मुबारक पठाण (वय 19-रा खोसपुरी ता.जि. नगर) या मजुराचा डोक्यात कुर्‍हाड घालून खून केला होता. त्यानंतर पवार हा फरार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात होते, मात्र तो पोलिसांना चकवा देत होता.

खबर्‍याच्या माहितीवरून संशयित आरोपी बुट्या उर्फ शिवराम पवार याला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील देवी निमगाव येथून डोंगर परिसरातून त्याच्या सासरवाडीतून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य रामनिरंजन वाघ यांच्या पोलीस पथकातील सहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार, कुमार कराड, पोलीस नाईक अनिल बडे, निलेश मस्के, अरुण शेकडे, अतुल शेळके यांनी शुक्रवारी पहाटे देवी निमगाव परिसरातील डोंगरातून संशयित आरोपी पवार याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पवार हा डोंगर भागात राहत असल्याने पोलिसांना ठिकाणापर्यंत जाण्यासाठी दुचाकीचा वापर करावा लागला, तर काही पोलीस कर्मचार्‍यांनी पायी चालत त्याठिकाणी वेढा घातला आणि आरोपीला पडकडण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com