इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले

इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले

श्रीगोंदा तालुका काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

श्रीगोंदा (प्रतिनिधी) / Shrigonda - वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले असल्याने श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या संदर्भामध्ये तहसील कचेरीवर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दीपक पाटील भोसले, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर दादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात आला. त्या ठिकाणी सामान्य जनतेच्या भावना व्यक्त करून तहसीलदार चारुशिला पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

यावेळेला तालुक्यातून काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगीताई पोटे, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष काका शिंदे, विद्यमान व्हाईस चेअरमन युवराज चितळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाळाआप्पा पाचपुते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे, सेवादलाचे अध्यक्ष, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, श्रीगोंदा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सोशल मीडियाचे अध्यक्ष उपस्थित होते. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातील शिवसैनिक यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com