इंधन दरवाढीपेक्षा मोदींच्या शुभेच्छांचा मोर्चा काढावा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना खा. विखेंचा टोला
इंधन दरवाढीपेक्षा मोदींच्या शुभेच्छांचा मोर्चा काढावा
खा. डॉ. सुजय विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी करोनाला (Covid 19) आळा घालण्यासाठी उत्तम प्रकारे उपाययोजना केल्या आहेत. त्या अन्य कोणत्याही पंतप्रधानाला करता आल्या नसत्या. त्यामुळे इंधन दरवाढीवरून मोर्चा (Morcha over fuel price hike) काढण्यापेक्षा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छांचा मोर्चा काढावा, परंतू राज्यातील सरकार(State Government) हे सेवेसाठी नाही तर मेवेसाठी एकत्र आलेले सरकार आहे, अशी टीका खा. डॉ. सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe Criticism) यांनी केली.

इंधन दरवाढीवर केंद्र सरकार उपाययोजना करेलच.(The central government will take measures on fuel price hike) दरवाढीच्या नियंत्रणापेक्षा सध्या कोविड नियंत्रणासाठी लसीकरण (Vaccination) व लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी राज्य सरकारने (State Government) ग्लोबल टेंडर काढून नंतर ते रद्द केले. आता केंद्र सरकारच्या नावाने टीका केली जाते. परंतू या सरकारने केंद्राकडे किती पाठपुरावा केला. इंधन दरवाढीवरून या सरकारमधील पक्ष मोर्चे, आंदोलने करीत आहे. त्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या अभिनंदनाचे, शुभेच्छांचे मोर्चे काढावेत, असे खा. विखे (MP Sujay Vikhe) म्हणाले.

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीबाबत बोलताना खा. विखे म्हणाले, या ठिकाणी व्हीजन असलेली व्यक्ती अध्यक्षपदी पाहिजे. एखाद्या उद्योगपतीला संस्थानचे अध्यक्ष केले पाहिजे. तेव्हाच काही बदल होर्ईल. एका मंत्र्याच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणातील वाळूउपसा आपण याआधी कधी पाहिलेला नाही, असे ते म्हणाले.

श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत विचाऱले असता खा. सुजय विखे पा. म्हणाले, सर्व घटक पक्षांना बरोबर घेवून त्यांच्याबरोबर चर्चा करुन निर्णय घेवू. शहरात प्रकाश चित्ते आहेतच. त्यांना चांगला अनुभव आहे. ते ही जबाबदारी स्विकारतील, असे सांगत त्यांनी श्रीरामपूरची जबादारी चित्ते यांचेवर टाकली. श्रीरामपुरातून जाणार्‍या गेवराई-अकोला या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करून तो रस्ता होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करू, असेही खा. विखे म्हणाले.

बंद असलेल्या या संस्थेला पुन्हा सुरू करण्याबाबत विचारले असता, त्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार असून ज्यांनी या संस्थेची स्थापना केली त्या तनपुरे यांच्या घरात राज्याचे ऊर्जामंत्रीपद -आहे. त्यांनीही सरकारमध्ये आपले वजन वापरून संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खा. विखे यावेळी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com