
वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev
इंधनात दरवाढ होत असल्याने बोअरवेल असोसिएशनकडून नवीन दरपत्रक जाहीर आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहता, शिर्डी आदी ठिकाणच्या बोअरवेल व्यावसायिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरपंच आबासाहेब गवारे यांचे मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
यावेळी शासनाकडून इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने बोअरवेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. इंधन दरवाढीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने बोअरवेल असोसिएशन व्यवसायिकांच्या बैठकीमध्ये सामूहिक चर्चा करून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ड्रिलिंग साडे सहा इंच 95 रुपये प्रति फूट, क्रिसिंग 300 रुपये तर री बोअर 50 रु. प्रति फुटाप्रमाणे तर क्रेसिंग मजुरी 150 रुपये दर अशे नियमावली तयार करण्यात आली आहे.
असोसिएशनच्या परिसरात बाहेरून एखादा व्यवसायिक बोअरवेल घेत असेल तर त्यांने प्रथम असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून संघटनेच्या नियमावलीचे पालन करावे, अन्यथा त्या वाहन व व्यावसायिकावर 1 लाख रुपये दंड आकारण्यात येईल, तसेच 15 दिवसाकरीता संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना यावेळी व्यावसायिकांना देण्यात आल्या.
सरपंच आबासाहेब गवारे (विश्व बोअरवेल), सतीश सुलताने (श्रीराम बोअरवेल), बाळासाहेब थोरात (ओमसाई बोअरवेल), प्रवीण पाटील (अरिहंत बोअरवेल), योगेश थोरात पाटील (साईच्छा बोअरवेल), शिंदे मामा (गौरी बोअरवेल), अमोल चौधरी (विरसाई बोअरवेल), गणेश चेडे (रेणुका बोअरवेल), नाना भांबारे (साई प्रसाद बोअरवेल), अजित कोकाटे पाटील (मळगंगा बोअरवेल), नितिन फलके (श्रीराम बोअरवेल), नितीन खरात (ओमसाई बोअरवेल), शुभम मखरे (साईशक्ती बोअरवेल), गणेश पोपळघट (विकास बोअरवेल), श्री विधाटे (त्रिशुल बोअरवेल), रावसाहेब रणनवरे (लक्ष्मी बोअरवेल), सचिन पेचे (श्रीनाथ बोअरवेल) आदी बोअरवेल व्यवसायिक यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नियमावलीचे पालन करण्याचे आश्वासन दिले. सरपंच आबासाहेब गवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.