शिक्षकांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून घोषित करावे

शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिक्षकांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून घोषित करावे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

राज्यातील सर्व शिक्षकांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून घोषित करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, त्यांना विमा कवच व अन्य सुविधा लागू करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभागाच्या वतीने अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे तसेच कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती शिक्षक परिषद शेवगाव संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे.

सरकारने वरील मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा असे तालुकाध्यक्ष विधाते, नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष सखाराम गारुडकर, शरद दळवी, जिल्हा सचिव तुकाराम चिक्षे, किशोर दळवी, अनिल आचार्य, अरविंद आचार्य, शशिकांत थोरात, विनायक कचरे, सुधीर आपटे, सतिश जगदाळे, बाबासाहेब बोडखे, सत्यवान थोरे, प्रदिप बोरुडे, हरिभाऊ कोथिंबीरे, सुधीर बढे, प्रा. नितीन मालानी, प्रदीप पांडव, किरण शेळके, संदिप झाडे, कारभारी लोणारी, राहुल ज्योतिक आदी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com