फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह तीन हजार नागरिकांना करोना ‘बुस्टर’

51 टक्के मुले झाली लसवंत
फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह तीन हजार नागरिकांना करोना ‘बुस्टर’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात प्रौढांपेक्षा 15 ते 18 या वयोगटातील कुमारांचे लसीकरण गतीने होत असून एका आठवडाभरातच त्यांनी 51 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यात 3 जानेवारीपासून 1 लाख 22 हजार 64 कुमारांचे लसीकरण झाले आहे. दुसरीकडे बुस्टर डोसही सुरू झाला आहे. दोन दिवसांत 3 हजार 252 फ्रंटलाईन कर्मचार्‍यांसह ज्येष्ठांना डोस देण्यात आला आहे.

ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात या वयोगटात 2 लाख 38 हजार 943 एवढे मुले-मुली आहेत. 3 ते 11 जानेवारी या आठ दिवसांत त्यातील 1 लाख 22 हजार 64 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. हे प्रमाण 51 टक्के झाले आहे. म्हणजे आठच दिवसांत निम्म्या मुलांना लस देण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. अजून आठ दिवसांत उर्वरित उद्दिष्टही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

याशिवाय 10 जानेवारीपासून 60 वर्षांवरील नागरिक, तसेच आरोग्य व फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस सुरू करण्यात आला. त्यात गेल्या दोन दिवसांत 2212 आरोग्य कर्मचारी, 466 फ्रंटलाईन वर्कर, तर 574 ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात 15 वर्षांपुढील वयोगटात एकूण 38 लाख 42 हजार 543 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 30 लाख 59 हजार 346 (79.06 टक्के) जणांनी पहिला, तर 18 लाख 64 हजार 207 (48.5 टक्के) जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत असे एकूण 49 लाख 26 हजार 805 डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

ज्युनिअर कॉलेज बंदचा फटका

जिल्ह्यात सोमवारपासून पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग 15 फेबु्रवारीपर्यंत बंद केले आहेत. यामुळे ज्युनिअर कॉलेजच्या अकरावीच्या वर्गात एक गठ्ठा होणारे मुलांचे लसीकरण थांबले आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना मुलांच्या लसीकरणाला बे्रेक लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com