सिव्हील हॉस्पिटलमधून 81 हजारांचा मुद्देमाल लंपास

ऑपरेशन थिएटर साहित्यांची चोरी : दोघांविरूद्ध गुन्हा
सिव्हील हॉस्पिटलमधून 
81 हजारांचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर (प्रतिनिधी) - सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन चोरट्यांनी डल्ला मारून नवीन ऑपरेशन थिएटर उभारणीसाठी आणलेल्या 81 हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली.

याप्रकरणी रोशी कैलास काला (वय 36 रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. लखन अनिल घोरपडे (वय 28) व मुरलीधर विश्‍वनाथ पाखरे (वय 55) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पाखरे याला अटक केली आहे.

फिर्यादी मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे ठेकेदार आहेत. फिर्यादी यांना एप्रिलमध्ये सिव्हील हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरचे काम मिळाले आहे. त्यांनी कामही सुरू केले आहे. या कामासाठी लागणारे साहित्य हॉस्पिटलमधील एका रूममध्ये ठेवले आहे.

चोरट्यांनी रूमचा दरवाजा तोडून 8 मे रोजी 36 हजार 365 रुपयांचे 59 नग आयसोलेशन व्हॉल्व्ह, 25 मे रोजी 29 हजार 250 रुपये किमतीचे कॉपर पाईप, 29 मे रोजी 14 हजार 750 रुपयांचा एक्सप्शन व्हॉल्व्ह असे 81 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.

Related Stories

No stories found.