मोकाट कुत्र्यांना घाबरुन वानर चढले विद्युत वाहिनीवर

मोकाट कुत्र्यांना घाबरुन वानर चढले विद्युत वाहिनीवर

देवठाण (वार्ताहर) - कुत्रे मागे लागल्याने वानर विद्युत वाहिनीच्या पोलवर चढले. महावितरणच्या वायरमनने तात्काळ वीज पुरवठा खंडीत केल्याने सुदैवाने या वानराचा जीव वाचला आहे.

अकोले तालुक्यातील देवठाण शिवारातील जंगलात सिन्नर नगरपरिषदेने अनेक मोकाट कुत्रे आणून सोडलेले आहेत. भुकेने व्याकुळ झालेले हे मोकाट कुत्रे वन्य प्राण्यांवर सामुदायिकपणे हल्ला चढवतात. बुधवारी सकाळी कुत्र्यांनी वानर पाहिले अन त्याचा पाठलाग सुरू केला.

हे वानर घाबरून पळत असताना जवळच असलेल्या 11 केव्ही या मेनलाईन च्या खांबावर चढले. त्याच्या सुदैवाने महावितरण चे वायरमन रामनाथ पथवे यांनी व इतरांनी अत्यंत तातडीने विद्युत उपकेंद्रात फोन करून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे त्याचा जीव वाचला. विलास पथवे, काशिनाथ पथवे, अर्जुन मेंगाळ, गोधाजी पथवे, गंगाराम पथवे यांनी याकामी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com