मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न

खारेकर्जुने शिवारातील घटना || दोघांवर गुन्हा
मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मित्राला मदत (Friend Help) केल्याचा राग (Anger) मनात धरून एकाच्या खुनाचा प्रयत्न (MurderTry) केल्याची घटना 30 डिसेंबर, 2022 रोजी खारेकर्जुने (Khare Karjune) (ता. नगर) शिवारातील गोकुळवाडीत घडली. देविदास दगडू फलके (रा. खारेकर्जुने, गोकुळवाडी) असे जखमी (Injured) व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 5 जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दोघांवर खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. मारूती दगडू फलके (वय 62 रा. खारेकर्जुने, गोकुळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न
पुण्याच्या व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

भागचंद भानुदास भापकर, शंकर होनाजी निमसे (दोघे रा. खारेकर्जुने, गोकुळवाडी) अशी गुन्हा दाखल (Filed a Case) झालेल्या संशयितांची नावे आहेत. भागचंद भापकर व त्याचा भाऊ कुणाल भापकर यांच्यात मेंढ्या वाटपाच्या कारणावरून वाद (Dispute) झाले होते. या वादात कुणाल भापकर यांचा मित्र देविदास फलके यांनी मदत केली असल्याचा राग (Anger) मनात धरून भागचंद याने शंकरच्या मदतीने देविदास फलके यांच्यावर जीवघेणा हल्ला (Attack) केला.

मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न
खळबळजनक! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

देविदास फलके हे 30 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता डबा घेऊन जात असताना खारेकर्जुने गावातील मराठी शाळेच्या पाठीमागे त्यांना भागचंद व शंकरने अडविले. जीवे ठार (Death) मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने डोक्यात तसेच तोंडावर हातापायावर व डोळ्यावर जबर मारहाण (Beating) करून खुनाचा प्रयत्न (Murder Try) केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी (Injured) देविदास दगडू फलके यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मित्राला मदत केल्याने एकाचा खुनाचा प्रयत्न
हजाराच्या लाचेसाठी जीएसटी अधिक्षकासह निरीक्षकही जेरबंद

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक चाहेर आदींनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. यासंदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com