मोरोक्को देशातून शिक्षकांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबीर संपन्न

मोरोक्को देशातून शिक्षकांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबीर संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या च्या योग टिचर रचनाताई फासाटे यांनी भारत देशातील आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर 11 मे पासून 16 मे पर्यंत आयोजीत केले होते. या शिबिरात सुमारे 500 शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंब सहभागी झाले होते.

सध्या संपूर्ण जगावर करोनाचे संकट आहे. त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती व ऑक्सिजन पातळी वाढली पाहिजे. सध्या आपला श्‍वास व आपले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे .आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सध्या योग प्राणयामची अत्यंत आवश्यकता आहे. हा उद्देश समोर ठेवून मोरक्को देशातून योगा ट्रेनर रचनाताई फासाटे यांनी झूम मिटिंगद्वारे हे योग प्राणायाम शिबिर भारतीय वेळ संध्याकाळी 5 ते 6 असे दररोज एक तास असे सहा दिवस घेतले. या शिबिरात त्यांनी सर्व प्रकारच्या योग प्राणायाम बाबत आनंददायी व कृतिशील मार्गदर्शन करून शिक्षकांकडून हे योग प्राणायाम करून घेतले.

या शिबिरात पद्मश्री पोपटराव पवार, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, पद्मश्री राहीबाई पोपेरे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. डी. सुर्यवंशी, पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, नेवासा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड, शेवगावचे गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, राष्ट्रपती पुरस्कार विजेते एटीमचे राज्य संयोजक व शिक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता कमिटीचे सदस्य विक्रम अडसुळ, राज्य पुरस्कारप्राप्त शोभाताई पवार, शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी या शिबिरात कृतिशील सहभाग घेऊन शिबिरातील समारोपात उत्कृष्ट मार्गदर्शन करून अशा शिबीराची सध्या गरज असल्याचे सांगितले. शिबिराचे आयोजन उपक्रशील शिक्षक तुकाराम अडसूळ, आदर्श उपक्रमशिल शिक्षिका शुभांगी शेलार यांनी केले. यासाठी तांत्रिक मदत योगेश सूर्यवंशी, प्रकाश फासाटे आणि अर्चनाताई यांनी केली.

शिक्षक राजू बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले. रचनाताई फासाटे यांचे भारतातील अनेकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com