वाहन खरेदी-विक्रीतून 14 लाखांची फसवणूक

एमआयडीसीत दोघांविरोधात गुन्हा
वाहन खरेदी-विक्रीतून 14 लाखांची फसवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - नागापूर एमआयडीसी येथील शुभयान अ‍ॅटो प्रा. लि. कंपनी मालकीच्या दोन पिकअप व एक ट्रकची दोघांनी परस्पर विक्री केली. यात कंपनीची 13 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शुभयान कंपनीचे अशोक सावळेराम बोठे (वय 58 रा. वाळकी ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संदीप पुरूषोत्तम वरणकर (रा. सानेगाव सांबळा, नागपूर) व प्रमोद नारायण दुसा (रा. चितळे रोड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com