दलालांकडून शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीत लूट
File Photo

दलालांकडून शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीत लूट

कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भातकुडगाव फाटा येथील अवैध खासगी कापूस खरेदीदारांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विलास फाटके यांनी उपोषण सुरू केले आहे.

फाटके यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे खासगी दलालाकडून कापूस खरेदी केला जातो. या दलालांकडे कापूस खरेदीचा कुठल्याही प्रकारचा परवाना नाही. या व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाबाबत बाजार समिती कुठलीही हमी घेत नसल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूटमार होत आहे. या दलालांकडे घेतलेल्या कापसांच्या वजनात मोठी तफावत आढळून येत आहे.

यांचे वजन काटे कधीही कोणीही तपासणी करत नाही. शेतकर्‍यांकडून उधार कापूस घेतला जातो. नंतर शेतकर्‍यांना पैसे दिले जात नाहीत. शेतकर्‍यांवर दादागिरी केली जाते. कष्टाने पिकवलेल्या कापसाची लुटमार या व्यक्तींकडून केली जात आहे. याबाबत बाजार समिती व सहायक निबंधक सहकार संस्था कार्यालय शेवगाव याच्याकडे तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी कारवाई करावी आणि शेतकर्‍यांची लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com