पावणेदहा लाखांची फसवणूक

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पावणेदहा लाखांची फसवणूक

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

हरेगावरोड, शिरसगाव, श्रीरामपूर येथे आपण एनटेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस, प्रा. लि. या कंपनीचे एफएमजीसी व ग्रोसरी प्रॉडक्ट कंपनीच्या खात्यात पैसे जमा न करता किरकोळ दुकानदाराला विकलेले मालाचे 9 लाख 43 हजार 540 रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून फसवणूक केली. तसेच कंपनीच्या मालाची वेअर हाऊसमध्ये तपासणी केली असता त्यामध्येही तफावत दिसून आली. यानुसार पार्टनरने पार्टनरची फसवणूक केली असून श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरेगावरोड, शिरसगाव, श्रीरामपूर येथे एनटेक्स ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस, प्रा. लि. नावाची कंपनी असून त्यांच्या वेअर हाऊसमध्ये मयुर भिमराव शिंदे हे एक वर्षापासून काम करत आहे. सदरची कंपनी श्रीरामपूर शहर व तालुक्यात एफएमजीसी व ग्रोसरी प्रॉडक्ट विविध दुकानांमध्ये होलसेल स्वरूपात विक्री करण्याचा व्यवसाय करत असते. श्रीरामपूर तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील श्रीकांत खेंगट यास 31 मे 2021 पासून पार्टनर म्हणून या कंपनीचे वेअरहाऊस चालविण्यास दिले होते. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील किरकोळ दुकानदारांच्या मागणीप्रमाणे त्यांना एफएमजीसी व ग्रोसरी प्रॉडक्ट विक्री करणे व त्या मालाचे त्यांच्याकडून पैसे घेऊन ते कंपनीच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी श्रीकांत खेगट याची होती.

तसेच वेअर हाऊसमधील मालावरही लक्ष ठेवण्याचे काम होते. परंतु, दि. 9 सप्टेंबर 2022 ते दि. 17 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये किरकोळ दुकानदाराला विकलेले मालाचे 9 लाख 43 हजार 540 रुपये डिलीव्हरी बॉईजमार्फत श्रीकांत खेंगट याने जमा करून घेतले. परंतु, सदर रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता स्वतःकडे ठेवून फसवणूक केली. तसेच कंपनीच्या मालाची वेअर हाऊसमध्ये तपासणी केली असता त्यामध्येही तफावत दिसून आली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांत मयुर भीमराव शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1046/2022 प्रमाणे श्रीकांत खेंगट याचेविरुध्द भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com