अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगरमधील संपदा पतसंस्थेच्या 32 कोटींच्या गैरप्रकारातील मुख्य आरोपी व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानदेव वाफारे यांची

काँग्रेस पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकार्यांनी केली आहे.

वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव 32 कोटींच्या ठेवी वसूल कराव्यात व त्यांचे ठेवीदारांना वाटप करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने यापूर्वीच दिला होता. त्याला वाफारे याने स्थगिती घेतली होती. ही स्थगिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने उठविली असून वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याच कारणासाठी वाफारे याने काही महिने तुरुंगाची हवा अनुभवली आहे.

पक्षाने भ्रष्ट प्रतिमेच्या लोकांना पदे देण्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी वाफारे यांची काँग्रेस पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी शहरकाँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, विद्यमान प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, फिरोज शफी खान, महिला शहर जिल्हाध्यक्षा सविता मोरे, भिंगार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मार्गरेट जाधव, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार व रवि सुर्यवंशी, अभिजित कांबळे व मुकुंद लखापती, रुपसिंग कदम, एम.आय.शेख यांनी केली आहे.