जामखेड तालुक्यात करोनाचा चौथा बळी
सार्वमत

जामखेड तालुक्यात करोनाचा चौथा बळी

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू

Nilesh Jadhav

जामखेड | तालुका प्रतिनिधी | Jamkhed

जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेचा करोनाने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. आत्तापर्यंन्तचा जामखेड तालुक्यातील हा कोरोनाचा चौथा बळी आहे.

शहरातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली आहे. आत्तापर्यंन्त जामखेड शहरात १९ रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महीलेची तब्येत बिघडल्याने तीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तीची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. मात्र तीच्यावर उपचार सुरू असतानाच तीचा रात्री मृत्यू झाला आसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी दिली. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्तापर्यंन्त तालुक्यातील मोहरी, खर्डा व जामखेड येथील दोन अशा एकुण अत्तापर्यंन्त चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com