चारचाकीची चोरी

चारचाकीची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) - दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना आता चारचाकी वाहने चोरीला जावू लागले आहेत. सावेडी उपनगरातील रासनेनगरच्या मयुरेश्‍वर अपार्टमेंट समोर लावलेली चारचाकी कार अज्ञात चोरट्याने लंपास केली.

सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी चारचाकीचे मालक ज्ञानदेव एकनाथ हारदे (वय 60 रा. रासनेनगर, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांची कार अपार्टमेंटमध्ये पार्क केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com