बायोडिझेलचे चार टँकर पकडले

कामरगाव, जातेगाव फाट्यावर कारवाई; चौकशी सुरू
बायोडिझेलचे चार टँकर पकडले

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलिसांनी तालुक्यातील कामरगाव शिवारात सोमवारी रात्री बायोडिझेलचे दोन टँकर पकडले. तसेच सुपा पोलिसांनी जातेगाव फाटा येथे दोन टँकर पकडले. पोलिसांनी या टँकर चालकाकडे चौकशी सुरू केली आहे. हे बायोडिझेल अवैध विक्रीसाठी चालले होते की, कंपनीसाठी याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान हे टँकर मुंबईवरून भरून आले होते. नगर तालुका पोलिसांनी पकडलेल्या दोन टँकर पैकी एक जालना येथे जात होता. तर दुसरा टँकर नगरमध्ये खाली होणार होता, अशी माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

महिनाभरापूर्वी नगर शहराजवळील केडगाव बायपास, नगर तालुक्यातील वाटेफळमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बायोडिझेल पकडले होते. यातून बायोडिझेलचे रॅकेट समोर आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान अवैध बायोडिझेल विक्रीवर छापे टाकून ते बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. नगर तालुका पोलिसांनी दोन टँकर पकडले. तसेच सुपा पोलिसांनीही दोन टँकर पकडले. टँकर चालकाकडे तपासणी दरम्यान अपेक्षीत माहिती न मिळाल्याने पोलिसांनी ते ताब्यात घेतले. याप्रकरणी मंगळवारीही चौकशी सुरू होती. बायोडिझेलची तस्करी होत असल्याचे समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

जातेगाव फाटा येथे दोन टाँकर उभे असल्याची माहिती मिळताच आम्ही ते ताब्यात घेऊन सुपा पोलीस स्टेशनला आणले. त्यातील इंधन बायोडिझेल की कंपनी ऑईल की अन्य काही, याची तपासणी करावी असे पत्र तहसीलदारांना दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.

- डॉ. नितिनकुमार गोकावे, पोलीस निरिक्षक सुपा पोलीस स्टेशन.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com