बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

शेतकऱ्याचे पन्नास हजारांचे नुकसान
बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

आंबी | Ambi

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील बेलापूर खुर्द (Belapur Khurd) येथे सुदाम नारायण शिंदे या गरीब शेतकऱ्याच्या चार दुभत्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला (leopard attack) करून ठार केल्या. बुधवारी (दि.०४) रात्री एक वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे शिंदे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.

प्रवरा (Pravara) पंचक्रोशीत बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले (Massive attacks of leopards) वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी केसापूर (Kesapur) येथील शेतकरी उत्तम मेहेत्रे यांच्या केशव गोविंद बन परिसरात चालू गाडीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या हल्ल्यात मेहेत्रे बालंबाल बचावले होते.

प्रवरा पट्ट्यात उसाचे (sugarcane) मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना आयता आसरा मिळत आहे. तसेच मुबलक पाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, पाळीव कुत्री यांना बिबटे भक्ष्य बनवीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करताना दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन नित्य झाले आहे. शेतात पाणी भरताना, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. मजूर काम करायला धजावत नाहीत.

कोपरगाव (Kopergoan) येथील वनरक्षक पवार, डॉक्टर खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ज्ञानदेव टाकसाळ, निवृत्ती भगत, बबनराव भगत, चांगदेव शिंदे, बाळासाहेब शिंदे, पोपट कुरहे, ग्रामसदस्य सदस्य दिलीप भगत, विनायक भगत, पोलीस पाटील युवराज जोशी, बेलापूर वनसेवक लांडे काका, किशोर शिंदे, महेश शिंदे यांसह बेलापूर खुर्द, केसापूर ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com