चार दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक मुसळधार

पुणे आयएमडीचा पावसाचा अंदाज
चार दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक मुसळधार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात (State) अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (rain) कोसळत आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत (Heavy rains in Kokan) आहे. तर मध्य महाराष्ट्रात मोडणार्‍या नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विस्कळीत स्वरूपात पाऊस पडत असून पुढील चार दिवस म्हणजेच 21 तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra)अनेक ठिकाणी पावसासह काही ठिकाणी तुरळक मुसळधार पावसाची शक्यता पुणे आयएमडीच्या (Pune IMD) शनिवारच्या अहवाल वर्तविण्यात आली आहे.

राज्यात कोकणात रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात गेला आठवडाभर चांगला पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातार्‍यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, औरंगाबाद, जालना या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात 18 जुलैला बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार, 19 जुलैला बर्‍याच ठिकाणी पावसासह घाट विभागात तुरळक जोरदार पावसाची शक्यता आहे. 20 आणि 21 जुलैला बर्‍याच ठिकाणी पावसासह घाट विभागात तुरळक अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

यासह पुढील चार दिवस कोकणात भरपूर पाऊस होणार असून काही ठिकाणी सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यात पुणे आयएमडीकडून (Pune IMD) वर्तविण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस झाला असून यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com