माजी सैनिकाची हत्या करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे झाली होती हत्या
माजी सैनिकाची हत्या करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर|Ahmedagar

पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथे किरकोळ कारणावरून माजी सैनिक विश्वनाथ कारभारी फुंदे (रा. फुंदे टाकळी ता. पाथर्डी) यांची नऊ जणांनी हत्या केली होती.

या हत्याकांडातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुरी तालुक्यातील कानडगावच्या डोंगरामध्ये पाठलाग करून शिताफीने पकडले. पकडलेल्या चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपासकामी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुधीर संभाजी शिरसाठ (वय २६ रा. आसरानगर, पाथडी), आकाश पांडूरंग वारे (वय २४ रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय २१ रा. विजयनगर, पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (वय २३ रा. शंकरनगर पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला केतन जाधव (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) हा पसार झाला आहे.

६ एप्रिल रोजी सकाळी सुधीर शिरसाठ याने मच्छिंद्र कारभारी फुंदे (रा. कुंदे टाकळी ता. पाथर्डी) यांचे टाकळी फाटा येथील साईप्रेम हॉटेल समोर वाहन उभे केले होते. त्यावेळी मच्छिंद्र यांचा भाऊ विश्वनाथ कारभारी फुंदे यांनी सुधीर शिरसाठ यास हॉटेल समोरुन वाहन बाजूला घेण्यास सांगीतले. त्याचा राग मनात धरुन सुधीरने त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेवून

विश्वनाथ यांना लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करुन त्यांना जबरदस्तीने वाहनामधून पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागे आणून जबरदस्तीने दारु पाजून पुन्हा लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करुन त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com