राहुरीत करोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच
सार्वमत

राहुरीत करोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच

मेडिकल सह सर्व दुकाने 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

Nilesh Jadhav

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

तालुक्याला करोना विषाणूचा वेढा वाढत असल्याचे चित्र आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे विलगिकरण कक्षात असलेले देवळाली प्रवरा येथील 3 तर राहुरी शहरातील 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राहुरीत रुग्ण संख्या 34 इतकी झाली आहे. वाढलेली रुग्ण संख्या पाहता व्यापारी असोसिएशनने प्रशासन समवेत बैठक घेतली. मेडिकल सह सर्व दुकाने 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com