अहमदनगर | Ahmednagar

आईसह चार मुले बेपत्ता झाल्याची घटना...

सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब गणपत पानसरे (वय ४५) यांनी ही तक्रार दिली आहे. बाळासाहेब पानसरे यांची पत्नी पल्लवी पानसरे (वय ३६), मुलगी वैष्णवी पानसरे (वय १८), वैभवी पानसरे (वय १८), सोनल पानसरे (वय १७) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
.धक्कादायक! करोना लाॅकडाऊनच्या भीतीने तरुणाने केली आत्महत्या.
३ फेब्रुवारीला सकाळी बाळासाहेब यांचे पत्नी पल्लवी सोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यानंतर पल्लवी आपल्या चार मुलांना घेऊन शिक्रापुर (जि. पुणे) येथे बाळासाहेब यांच्या साडुची मुलगी प्रिती जाधव यांचेकडे गेली.

यानंतर बाळासाहेब यांचे साडु विजय भगत यांनी बाळासाहेब यांना फोन करून सांगीतले की, पल्लवीने सोशल मिडीयावर मी आत्महत्या करीत आहे, असा मेसेज पाठवला आहे. यानंतर पत्नी पल्लवीसोबत संपर्क झाला नसल्याने बाळासाहेब यांनी पत्नी व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.