एकाच वेळी फुलली चाळीस ब्रम्हकमळाची फुले !
सार्वमत

एकाच वेळी फुलली चाळीस ब्रम्हकमळाची फुले !

राहाता येथील गणेश निकाळे यांच्या बागेत फुलली ब्रम्हकमळ

Nilesh Jadhav

राहाता | प्रतिनिधी | Rahata

राहाता येथे गणेश निकाळे यांच्या परसबागेत एकाचवेळी 40 ब्रम्हकमळ फुलल्याने परिसारत हा कुतूहलाचा विषय बनला आहे. ही मनमोहक आणि सुगंधी ब्रम्हकमळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. तर या फुलांचा सुगंध परिसरात दूरपर्यंत दरवळत होता...

श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळी ब्रम्हकमळ फुलतं असतात. त्यामुळे या फुलांची मोठ्या आस्थेने पूजा देखील केली जाते. पण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रम्हकमळ येणे फारच दुर्मिळ घटना आहे. एकाचवेळी 40 ब्रम्हकमळ फुलल्याचे दृश्य मनाला सुखावणारी ठरली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com