माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे प्रदीर्घ आजाराने रात्री नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील 'खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले. बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री होते.

दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पागोरी पिंपळगाव (तालुका पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी दिली.

जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ओढले गेले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com