आमदारांचे शिरसगावच्या समस्यांकडे दुर्लक्ष - अण्णासाहेब गवारे

आमदारांचे शिरसगावच्या समस्यांकडे दुर्लक्ष - अण्णासाहेब गवारे

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

श्रीरामपूर (Shrirampur) शहरालगत असलेले राजकीयदृष्ट्या (Political) महत्वाच्या शिरसगाव (Shirasgav) येथे श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्याचे आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी आमदार (MLA) झाल्यापासून शिरसगाव (Shirasgav) येथे भेट दिली नाही अथवा गावातील समस्या सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न (try) केले नाहीत. श्रीरामपूरच्या (Shrirampur) आमदारांनी शिरसगाव (Shirasgav) या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष (Ignore) केल्याचा आरोप माजी सरपंच अण्णासाहेब गवारे (Former Sarpanch Annasaheb Gavare) यांनी केला आहे.

शिरसगावातून (Shirasgav) त्यांना जास्त मताधिक्य दिले असताना त्यांनी इतर गावांसाठी कोट्यवधी निधी दिला व विकास कामे केली पण शिरसगावसाठी मात्र लक्ष न देता काहीही कामे केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याची खंत श्री. गवारे (Former Sarpanch Annasaheb Gavare) यांनी व्यक्त केली.

शिरसगाव (Shirasgav), ब्राम्हणगाव (Bramhangaon), खैरी (Khairi) ते शिरसगाव रस्ता (Shirasgav Road), शिरसगाव (Shirasgav) ते इंदिरानगर (Indaranagar) रस्ता हे खराब झाले असून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अनेकवेळा मागणी करून पूर्तता झाली नाही. करण ससाणे (Karan Sasane), बाबासाहेब दिघे यांनी गावातले रस्ते केले, आरोग्य केंद्र (Health Center), आरटीओ कार्यालय (RTO Office), आदिवासी वसतिगृह (Tribal hostel) आणले. माजी आ. भाऊसाहेब कांबळे (Former MLA Bhausaheb Kamble) यांनी बरीच कामे केली. रस्ते डांबरीकरण केले. खा. सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांनीही इंदिरानगर ते ओव्हरब्रिजपर्यंत रस्ता डांबरीकरण केला. पण आमदारांची एक पण फेरी झाली नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तरी त्यांनी एकवेळ शिरसगाव (Shirasgav) येथे भेट देऊन काही समस्या रस्ते दुरुस्ती, इतर अडचणी जाणून घ्याव्यात व आमदार निधीतून जी कामे शक्य होतील ती करून द्यावीत, अशी अपेक्षा अण्णासाहेब गवारे यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com