डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे निधन

डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांचे निधन

राहुरी | प्रतिनिधी

जेष्ठ नेते रावसाहेब साबळे उर्फ अण्णा यांचे दुःख निधन झाले आहे. पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसापूर्वी त्यांना करोना संसर्ग झाला होता. सुरुवातीला त्यांना नगर येथे उपचार साठी दाखल केलं होतं नंतर पुणे येथे हलवण्यात आलें. सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राहुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

राहुरी कारखाना व जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष पद याबरोबर संत कवि महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष पद त्यांनी भुषविले होते. तमुळा प्रवरा विज संस्थेचे संचालक या सह विविध संस्थेवर संचालक पद भुषविले होते. १९८९ साली राहुरी कारखाना विकास मंडळाच्या ताब्यात त्यांच्या मुळे आला होता. अतिशय सहनशील व मुरब्बी राजकारणी म्हणून ते परिचित होते.

तसेच काँग्रेसकडुन विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना त्यात अपयश आले. दिवंगत डाॅक्टर दादासाहेब तनपुरे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या सह जिल्ह्यातील अनेक नेत्यांबरोबर राजकारणात सहभाग होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com